महाराष्ट्रशैक्षणिक UPDATES


सिग्नल शाळेतील मुलांसाठी सुरू होतेय बँक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे
कॅशकाऊंटरवर जाताच पे स्लिप भरत हाती येणारी रोख रक्कम, व्याजदराची आकडेमोड करीत बांधली जाणारी आर्थिक गणिते, पासबुक भरण्यासाठी लागणारी रांग हे चित्र शहरातील कोणत्याही बँकेचे नसून सिग्नल शाळेत दिसणारे आहे. विद्यार्थ्यांना बँकिग क्षेत्राची ओळख करून देतानाच विद्यार्थ्यांची आर्थिक पुंजी सुरक्षित रहावी यासाठी सिग्नल शाळेची खरीखुरी बँक सुरू होत असून याच विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी मुक्त प्रयोगशाळेचा बेतही आखण्यात आला आहे.


शिक्षणाधिकारी लोहारांना सभेला मनाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावरील कारवाईवरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत जोरदार पडसाद उमटले. सीईओंना कारवाईचे अधिकार असताना, त्यांनी कार्यमुक्तीला स्थगिती कुठल्या आधारावर मिळवली यासंबंधी प्रशासनाने खुलासा करावा असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी घेतला. दरम्यान, सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन सभेत कुठलाही वाद उदभवू नये म्हणून अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेला बसू नये अशी सूचना केली होती. त्यानुसार लोहार हे सभेला उपस्थित नव्हते.


३१ डिसेंबरपर्यंत ;तंबाखुमुक्त शाळा; म्हणून घोषित करा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तंबाखुमुक्त शाळांसाठी पाच वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न कुचमाकी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापकांना डिसेंबरपर्यंत शाळा तंबाखुमुक्त शाळा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदीचे आदेशही पाळले जात नाहीत. त्यासह ‘तंबाखुमुक्त शाळा’ असे अभियान शिक्षण विभागाने राबविले. पाच वर्षांनंतरही या अभियानाला यश मिळालेले नाही. शाळांबाबत शिक्षण विभागाने पुन्हा नव्याने ‘तंबाखुमुक्त शाळा’ असा नारा दिला आहे. शाळांना ३१ डिसेंबरपर्यंत ‘तंबाखुमुक्त शाळा’ म्हणून घोषित करावे लागणार आहे.


स्काऊट गाइडचा राज्य मेळावा एक डिसेंबरला

म. टा. वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईडचा सहावा राज्यस्तरीय मेळावा १ ते ७ डिसेंबरदरम्यान होणार असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.
स्काऊट आणि गाइडची राज्य संस्था मुंबई, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट मेहेराबाद व अहमदनगर भारत स्काऊट आणि गाइड जिल्हा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले होते. दिपावलीच्या सुटीत हा मेळावा होणार होता.


बारावीच्या परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह सहा नोव्हेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह ७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत


हृदयविकारासाठी या चाचण्या गरजेच्या

मनोज देशमुख, एमडी रेडिओलॉजी आणि इमेजिंग
……
सीटी करोनरी अँजिओग्राफी या चाचणीचा उपयोग करून रक्तवाहिनी निमुळती होण्याची प्रक्रिया लक्षात येते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या गुठळ्या समजतात. शरीराला अधिक छेद करणाऱ्या कॅथेटर अँजिओग्राफी या चाचणीला ही पर्यायी चाचणी आहे. कॅथेटर अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिनीमध्ये कॅथेटर घालण्यात येते. ही चाचणी करण्याचा सल्ला हृदयविकारतज्ज्ञ, हृदयविकार शल्यविशारद किंवा प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरकडून देण्यात येतो. हृदय सुरू असताना या प्रक्रियेद्वारे इमेजिंग करण्यात येते.


समायोजनानंतरही शिक्षकांची फरफट थांबेना

म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे नवी मुंबई महापालिकेत समायोजन करण्यात आले. मात्र आठवडा होऊनही महापालिकेने या शिक्षकांना कामावर न घेतल्याने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तसेच सेवेत खंड पडण्याची भीती निर्माण झाली आहे. समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याची उत्तरे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षकांना दिली जात आहेत. मात्र कधी समायोजन होणार, हे गुलदस्त्यात असल्याने शिक्षकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.


शुक्रवारी शाळांचा लाक्षणिक बंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रिक्त जागांची भरती प्रक्रिया, अत्यंत तटपुंजे मिळणारे शिक्षकेतर अनुदान आणि महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण महामंडळास बैठकीसाठी चार वर्षांपासून डावलल्याच्या भावनेमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने शुक्रवारी (दि. २ नोव्हेंबर) रोजी लाक्षणिक बंद पुकारला आहे. शिक्षणसंस्थांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस राज्यातील शाळा बंद ठेवण्यात येतील. यात राज्यभरातून सुमारे ७ हजारावर शाळा सहभाग घेतील, असा दावा महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील आणि नाशिक विभाग अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.


आयुक्त मुंढेंनी पाठविले उपशिक्षणाधिकाऱ्यास माघारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी या पदावर नितीन बच्छाव यांच्याऐवजी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांची नियुक्ती करण्याच्या शिक्षण संचालनालयाच्या आदेशाला आयुक्त तुकाराम मुंढेंनी सोमवारी केराची टोपली दाखवली. शिक्षणाधिकारी या पदाची संगीतखुर्ची करणाऱ्या शिक्षण संचालनालयाची मुंढे यांनी कानउघडणी केली असून, वर्ग एकच्या पदासाठी वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला पदभार देण्यास नकार दिला. त्यामुळे पदभार घेण्यासाठी आलेल्या देवरेंना सोमवारी पदभार न घेताच माघारी परतावे लागल्याची चर्चा आहे.


ऐन परीक्षेत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचा तगादा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आल्यानंतरही शहरातील काही प्रतिष्ठित इंजिनीअरिंग कॉलेजांकडून ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तगादा लावण्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहे. सोमवारी पेपर असताना विद्यार्थ्यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी तगादा लावल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करावा की अर्ज करावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


२ नोव्हेंबरला शाळा बंद

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
शासनाच्या सततच्या अशैक्षणिक धोरणामुळे खाजगी शिक्षण संस्था व त्यावर कार्यरत शिक्षकांना अर्थिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. संस्थाचालकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने येत्या २ नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळा बंदचा इशारा दिला आहे.
राज्यभरात खासगी शिक्षण संस्थांमार्फत विनाअनुदानित तत्त्वावर शाळा सुरू करण्यात आल्या. अनेक संस्थांनी पैसे खर्च करून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य …..


सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांना कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई उच्च न्यायालयाने सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विविध कॉलेजांमधून कमी करण्यात आलेल्या ९६ प्राध्यापकांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. संस्थेने कोणतेही कारण नसताना प्राध्यापकांना कामावरून कमी केले होते, अशी माहिती सिंहगड समन्वय समितीतर्फे देण्यात आली.
थकित वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या प्राध्यापकांना संस्थेने कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केले. या प्राध्यापकांमध्ये कॉलेजमध्ये पूर्णवेळ ‘पे रोल’वर काम करणारे प्राध्यापक होते.


शैक्षणिक सहलींवर लगाम

परवानगी न घेतल्यास कारवाई; शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिला आहे. शाळा-कॉलेजांनी नियमानुसार सहलींचे आयोजन करावे. सहलीत अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना शाळा-कॉलेजांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहे.


पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर वर्गाची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. या परीक्षेत कोणताही बदल झाला नसल्याचे प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर वर्गांची परीक्षा येत्या ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. चार जिल्ह्यात एकूण ४९ परीक्षा केंद्रावर ३५ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. चार ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुटी असून १२ नोव्हेंबरपासून पुढील विषयांची परीक्षा होणार आहे.


‘सरल’मुळे 12 वी चे अर्ज भरण्यास बाधा

ज्युनिअर कॉलेजांच्या तक्रारीनंतर बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
फेब्रुवारी-मार्च २०१९मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची अर्जप्रक्रियेत सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा देणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची अर्जविषयक माहिती सरल डाटाबेस प्रणालीत भरताना काही ज्युनिअर कॉलेजांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


विद्यार्थी व मध्यान्ह भोजनासाठी पाणी कुठून आणायचे? दुष्काळाच्या झळा

म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी
पावसाने फिरवलेली पाठ, पाण्याचे कोरडे पडलेले उद्भव या मुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या टंचाईच्या झळा जशा नागरिकांना व जनावरांना बसत आहेत तशा झळा आता ग्रामीण भागातील शाळांनासुद्धा बसू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजना नंतर या विद्यार्थ्यांना पाणी कोठून उपलब्ध करून द्यायचे तसेच भोजन बनवताना लागणारे पाणी कोठून आणायचे, या प्रश्नामुळे शाळा व्यवस्थापन समिती सध्या त्रस्त झाली आहे.


New updates about SSC ENGLISH Activity Sheet.

*There will no A B C D set activity sheets from march 2019.

Q1. Language study
A. Grammar based on Previous knowledge.
1. Complete the words/spelling(4) . 2M
2. Copy the sentenses(2). 2M
3. Put words in alphabetical order(2) 2M
4. Punctuate the following. (2) 2M


दप्तराचे ओझे कमी होईना!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर
शालेय विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्यांच्या दप्तराचे ओझे अधिक होऊ नये, म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले होते. मात्र, नागपूर जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांमध्ये आजही या निर्देशाची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे. शिक्षण विभागानेसुद्धा आपला मासिक अहवाल राज्य शिक्षण विभागाकडे सादर करावयाचा होता. मात्र, अद्याप हा अहवालच शासनाकडे पोहोचलाच नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


विनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य सरकारचा धिक्कार असो, कायम विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजला तत्काळ १०० टक्के अनुदान मिळावे, शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सर्किट हाउस परिसरात जेलभरो आंदोलन केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षकांची उपेक्षा करू नये


वाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यासा’चे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामकाजाच्या वेळेत एकत्रित बसून सलग काही तास ‘वाचन ध्यास’ म्हणून व्यतीत करावा, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.


मनपाची माध्यमिक शाळा बंद होणार?

प्रशासनाकडून गांभीर्याने विचार सुरू; शिक्षकांसह विद्यार्थी-पालक अस्वस्थ
म. टा. प्रतिनिधी, नगर
महापालिकेची रेल्वे स्टेशन रस्त्यावरील माध्यमिक शाळा बंद करण्याचा विचार प्रशासनाद्वारे गांभीर्याने सुरू आहे. महापालिकेने आकृतीबंधात पदे नमूद नसताना या शाळेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच शिक्षक व एका शिपायाची नियुक्ती बेकायदेशीर ठरत असल्याने ती रद्द करण्याचा विचार होत आहे. येत्या आठवड्यात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, असा निर्णय झाला तर या शाळेतील शंभरावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू असताना अन्य शाळेत समायोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे.