👏🏻पवित्र-नागपुर निकाल…

😄थोडी खुशी-थोडा गम...

🌷5059/2017 संस्थाचालक महामंडळ विरुध्द शासन प्रकरणी संस्थाचालकांचा विजय झाला आणि शासन हारले, असा हर्षोल्हास मालकांत (?) व्यक्त होतोय…
🌷पण शासनापेक्षा टीईटी/अभियोग्यता धारक गुणवंत अंशत: हारले, कारण शिक्षक भरतीमध्ये मुलाखत व शैक्षणिक कौशल्य तपासताना शोषणाचा पर्याय खुला राहिला आहे…
🌷हा विजय अंशत: यासाठी आहे, मालकांना बिंदुनामावलीनुसार टीईटी/अभियोग्यता धारकांचीच भरती करायची आहे, म्हणजे अपात्रांची खोगीरभरती करता येणार नाहीच…
🌷टीईटी/अभियोग्यतांचा मागील 4/5 वर्षाचा निकालाचे अवलोकन केले तर तो फक्त आणि केवळ 2/3 टक्केच लागलाय, म्हणजे नौकरभरतीस पात्र उमेदवार किती व रिक्त जागा किती…?
🌷तात्पर्य 2/3 जागेच्या मुलाखतीस शेकडो टीईटी/अभियोग्यता धारक उपस्थित राहणार नाहीत आणि त्यामुळे मुलाखत घेताना मालकांकडे तु किती-तु किती याचे पर्यायसुध्दा फार कमी असतील…
🌷अवलोकन व अभ्यास तर असाही आहे, बहुसंख्य मालकांचे नातलग टीईटी/अभियोग्यता धारकच नाहीत, त्यामुळे जावई, साडुचा मुलगा, मुलगा, मुलगी सुन, भाचा, पुतन्या ही मंडळी अपात्रच आहेत…
🌷म्हणुन नागपुर खंडपीठाच्या निकालाने मालकांना नौकरभरतीचे एकतर्फी संपुर्ण स्वातंत्र्य मिळाले किंवा फार लॉटरी लागली असे समजणे तुर्तास/सध्या रास्त व योग्य ठरणार नाही…
🌷मालक जिंकल्याच्या ॆ
👍😄😄😄😄😄😄😄😄👍
🌷पवित्रमुळे शिक्षण संस्थाचालकाबाबत गैरसमज पसरला होता हा दावाही तकलादु व हस्यास्पद आहे, यासंदर्भात राज्यातील सर्व पोलिस ठाणे, 13 स्कुलट्र्युबुनल, हायकोर्ट व सुप्रिम कोर्टातील लक्षणिय संख्या असलेल्या असंख्य दाव्याचे सिंहावलोकन करावे लागेल…
🌷दोन वर्ष डी.एड.व एक वर्षाचे बी.एड. झालेल्या आणि टीईटी/अभियोग्यता धारकांची शैक्षणिक कौशल्य तपासुन मुलाखती घेणार, म्हणजे नेमके काय करणार व घडणार हे न समजण्या इतके कोणीच दुधखुळे नाही…
🌷शैक्षणिक कौशल्य तपासुन मुलाखती घेणारे निष्णात-तज्ञ-पंडित कोण, कारण असंख्य मालक तर बी.एड, एम.एड, पी.एचडी. धारक नाहीत, कांही तर जेमतेम अक्षरओळख असलेले किंवा अंगठछाप आहेत, सगळं अवघडच आहे…
🌷पण आम्ही जिंकलो आणि कुणाला तरी हरवलं या भ्रमात कुणी राहु नये, कारण बी.एड.धारक क संवर्गात तर डी.एड.धारक ड संवर्गात येतात व वर्ग 3/4 च्या मुलाखती बंद केल्याचा GR आणि नियमावली 1977 मधील नियम 4 (ब) तरतुद आणखी जीवंत आहे…
🌷सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही, यानुसार ही लढाई आणखी संपली नाही, गुणवंतांना न्याय मिळेलच. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…
👍👌👌👌👌👌👌👌👌👍